शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१३


चला नवयुगातील अद्यशक्तीचे दर्शन घेऊ या.......


ह्या नऊ दिवसांत आपण सर्व मिळून नऊ महान महिलांच्या कार्याचा गुणगौरव करणार आहोत. त्यांच्या अपार त्यागला आणि क्रांतीकारक शौर्याला सलाम करू.

सोमवार, ३० सप्टेंबर, २०१३

डोळे हे जुलमी गडे...!, objects coming out of eyes

डोळे हे जुलमी गडे...!, objects coming out of eyes


Mumbai building collaps : 7 BMC officers suspended, enquiry against 18

Finally, the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) has come out hard against its officers for negligence that resulted in the recent building collapse at Dockyard Road.


Seven officers have been suspended (see box). More heads will roll as the civic chief Sitaram Kunte, along with additional municipal commissioners Rajeev Jalota and Mohan Adtani, have proposed to conduct an enquiry against eighteen of their officers, including the suspended seven.
Out of these, eight officers belong to the Planning and Design department, a department responsible for repairs of BMC properties, and 10 officers of Markets department, under whose jurisdiction the Babu Genu Market department was.
Rajeev Jalota, assistant municipal commissioner, said, “We will be suspending 7 officers, and enquiry will be initiated against 18 officers. This is our first step, and further administrative enquiry will be conducted by me and Mohan Adtani.” Some top bureaucrats might be shown the door, with the possibility of suspension of the head of the Markets department Chandrashekhar Chore, assistant commissioner, Markets. More decisions will be taken after detailed enquiries.
A technical advisory committee has also been instituted under Laxman Vhatkar, director of engineering services and projects, with structural consultant Shashank Mehandale, Bharat Patil, deputy chief engineer of planning and design (western suburbs) Bharat Patil, and Sunil Rathod, executive engineer (building proposals) Sunil Rathod, as its other members. The committee will have to submit a report on the building collapse in a month.

शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१३


असा ही एक प्रयत्न        

आजची नविन पिढी खरचं गोरगोरिबांच्या प्रश्नाची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या समस्या जाणून त्यांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न करत आहे. कसे ते जाणून घेण्यासाठी वाचा त्याच्याच शब्दात....http://gunhegarichamagova.webs.com






गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१३


Terror attack in Jammu: 12 dead as militants target Army camp, police station


Lt Col Bikram Jeet and two soldiers were shot dead at an army camp in Samba, said the defence spokesperson. An encounter between the terrorists and security forces is underway at the Samba army camp.
The terrorists first attacked the Hiranagar police station in Kathua around 6.45am and killed four police officials.
"The terrorists, between three and four in number, reached the national highway and boarded an auto-rickshaw. They reached Hiranagar police station and opened fire indiscriminately, killing four police personnel."
The terror attack comes three days ahead of a scheduled meeting between Prime Minister Manmohan Singh and his Pakistani counterpart Nawaz Sharif in New York on the sidelines of the UN general assembly meet.



मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१३


आधार कार्ड सक्तीचे नाही

दि. 24 देशातील नागरिकांना कोणत्याही प्रकारे आधार कार्ड घ्यायचे किंवा  नाही. आधार कार्डची सक्ती करण्यात आलेली नाही. आधार कार्ड घ्यायचे किंवा नाही , हे ऐच्छिक असल्याची भूमिका केंद्र सरकारने सोमवारी सुप्रीम कोर्टात मांडली. मात्र विविध योजनासाठी आधार कार्ड सक्तीचे होत असल्याकडे कोर्टाने लक्ष वेधले आहे. सविस्तर वाचा...

.http://gunhegarichamagova.webs.com


सोमवार, २३ सप्टेंबर, २०१३


Bigg Boss 7': Hazel Keech becomes the first contestant to exit the house

After completing a week inside the 'Bigg Boss' house, actress Hazel Keech becomes the first contestant to say good bye to 'Bigg Boss Season Saath 7'The actress who comes from a British background managed to sail through the difficulties of hell and befriended almost everyone inside the house. Luck dealt Hazel a bad card when she found herself in the Jahannum house right from the get go.
ven though Hazel might have appeared to be a shy and docile person, she was one of the most enthusiastic people who gave her best for every task. In spite of facing a language barrier, Hazel was seen taking much effort in learning to talk in Hindi.Always smiling Hazel found a great friend in fellow contestant Elli and was seen opening up to her quite often. Though she fell sick during her last few days inside the house, Hazel still continued to remain cheerful all the time.Speaking on her exit Hazel said, ‘Bigg Boss has been a great experience and I will treasure it for rest of my life. It was quite easy for me to adapt to the place in spite of the limitations and it fortunately worked well for me. I met new people, made friends and also learnt that it is very important to have a positive energy when you are in the house.’ 




बिग बॉस 7 मधली पहिली प्रतियोगिता     रविवारी बाहेर.
दि. 23 बिग बॉस च्या सिझन 7 मधून अभिनेत्री हेजल हिला पहिल्याच अठवड्यात गुड बाय म्हणावे लागले.       बिग बॉस मधील नरकाच्या कठोर यतनेतून ब्रिटिश अभिनेत्री हेजल हिची सुटका झाली. हेजल हीने घरातील प्रत्येका बरोबर मैत्री केली होती. हेजल ही एक लाजाळू स्वभावाची होती तिला जे काम दिले ते तिने आनंदाने केले तिचे हिंदी चागंले नव्हते. त्यामुळे ती जास्त कोणा बरोबर बोलू शकत नव्हती.
बिग बॉसच्या घरात एली सारखी चांगली मैत्रिण तिला मिळाली होती. हेजल काही दिवसापासून आजारी होती. तिला कमी ओट मिळाल्यामूळे तिला आता बेघर व्हावे लागले आहे. पण तिने  “मला बिग बॉस च्या घरात चागंला अनूभव मिळाला आहे. व मला त्याच माझ्या पुढच्या अयुष्यता चांगलाच फायदा होईल मी एक सकारात्म ऊर्जा घेऊन माझ्या घरी जात आहे” असे ही ती म्हाणाली.http://gunhegarichamagova.webs.com

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१३

 अष्टविनायक दर्शन


     मयुरेश्र्वर, मोरगांव

   अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर. या गणपतीस श्री मयुरेश्र्वर असंही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी इथल्या पूजेचा वसा घेतला होता श्री मयुरेश्र्वर गणेशाचे हे स्वयंभू आणि आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी सुखकर्ता दु:खहर्ता ही आरती श्री समर्थ रामदास स्वामीना याच मंदीरात स्फुरली.



     चिंतामणी, थेऊर

 अष्टविनायकापैकी  थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचं ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचं हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणं खूप मोठं गणेशभक्त होत. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचं निधन थेऊरलाच झालं. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील याच ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कराकीर्द दाखवणारं कलात्मक दालन आहे.थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर. तालुक्यात असून पुण्यापासून हे 30 कि.मी. अतंरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे.


 सिध्दिविनायक, सिध्दटेकसिध्दटेकचा श्री सिध्दविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. हे भीमा नदीवर वसलेलं सिध्दिविनायकाचं स्वयंभू स्थान आहे, याचा गाभारा लांब-रूंदीनं भरपूर मोठा आहे. तसंच मंडपही मोठा आहे. पुण्यातील अहिल्याबाई होळकर यांनी हे मंदीर बांधले आहे.अहमदनगर जिल्हयातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौडपासून 99 कि.मी. अंतरावर आहे. तर राशिनपासून 142 किं.मी अतंरावर आहे.

  महागणपती, रांजनगाव

अष्टविनायकापैकी हा चौथा गणपती, या गणपतीला महागणपती असे म्हणतात. महागणपतीचं स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.त्रिपुरासुर या राक्षसास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या हेत्या. या शक्तीचा दुरुपयोग करून हा राक्षस स्वर्ग व पृथ्वीलोकांना भयंकर त्रास देत होता. त्यावेळी या राक्षसाचा वध करण्यासाठी शिवशंकराने गणेशाचे नमन करून करवून घेतला आशी दतंकथा आहे. अष्टविनायकापैकी सर्वात शक्तीमान असं महागणपतीचे हे रूप आहे. त्यांची सोड उजवीकडे आहे.  श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न आणि मनमोहक अशी श्रीची मूर्ती आहे.



   विघ्नेश्र्वर, ओझरअष्टविनायकापैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. इथल्या श्रीची मूर्ती लांब रुंद असून आष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखलं जात. श्रीच्या डोळ्यात माणिक असून कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न आणि मंगल मूर्ती आहे. श्री गणेश विघ्नाच हरण करतो म्हणून त्याला विघ्नेश्र्वर म्हणतात.
जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून 14 कि.मी. वर तर पुण्यापासून 85 कि.मी. वर आहे. इथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र आणि खोडद इथली आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुबिण आहे.



    गिरिजात्मक, लेण्याद्री अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक, जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजित्मक गणेशाचं हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदीरात दगडी खांब आहेत आणि त्यावर वाघ, सिंह, हत्ती असं सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. मंदीरात जाण्यासाठी सुमारे 400 पाय-या आहेत.लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक हा जुन्नरपासून 7 किं.मी अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे 97 कि.मी. अतंरावर हे ठिकाण आहे.


   वरदविनायक, महाडमहाडचा वरदविनायक हा अष्टविनायकापैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान आहे. या मंदीरासदर्भात एक कथा प्रसिध्द आहे.  एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली त्याप्रमाणे त्या व्यक्तीनं शोध घेतला आणि मूर्ती मिळाली तीच या मंदीरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. गणेशाची मूर्ती सिंहासन रूढ आहे आणि उजव्या सोंडेची आहे.रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली-खालापूरच्या दरम्यान आहे.



   बल्लाळेश्वर, पलीपालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्र्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचं हे मंदीर पूर्वेभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे.पाली खोपोलीपासून 38 कि.मी. अतंरावर आहे. तर पुण्यापासून 111 कि.मी अंतरावर आहे. खोपोली – पेण रस्त्यावर पालीस जाण्यासाठी रस्ता फुटतो. तर पनवेल-गोवा या राष्ट्रय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो.




शनिवार, ३१ ऑगस्ट, २०१३


हुडयांच्या मागणी वरून गर्भवती विवाहितेस जाळले. 

दि. 29   उत्तर प्रदेशितील संभल नगर येथे हुंड्याच्या मागणीवरुन सासू-सास-यंनी एका गर्भवती महिलेची हत्या केल्याचे वृत्त आज सूत्रांनी दिले आहे.
   रूपवती असे या महिलेचे नाव असून हुंड्याची मागणी पुर्ण न केल्याबद्दल तिला अगांवर रॅकेल टाकून जाळण्यात आले असे पोलिसांनी सांगितले. यामूळे गंभीर जखमी झालेल्या या महिलेस तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले.  मात्र उपचार सूरु असतानाच तिचा मुत्यू झाला.
        या संदर्भात रूपवतीचे वडिल वीरदाल यांनी तक्रार नोंदविली आहे. तिच्या सासरच्या लोकांपैकी अद्याप कोणालाही अटक झाली नाही.

मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१३

http://members.webs.com/s/sitebuilder/pages/297593144/

पत्नीस मारहाण-आोम पुरीना अटक

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्याविरोध्द त्यांच्या पहिल्या पत्नीने वर्सोवा पोलिस ठाण्यात मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोदंविला आहे.
           ओम पुरी हे वर्सोवा येथील सात बंगला परिसरातील त्रिशूल ईमारतीत राहतात. त्यांची पहिली पत्नी यांच्यात वाद आहे. त्याबाबत हे प्रकरण न्यायलयात चालू आहे. ओम पुरी यांनी निर्वाह खर्च दयावा. अशी मागणी नंदिता यांनी न्यायलयात केली आहे. तिने न्यायलयात हजार राहून नये म्हणून त्यांनी नंदिता यांना छडीने मारहाण केली. असा अरोप वर्सोवा पोलिस ठाण्यात ओम पुरीविरोध्द नोंदविला आहे.


शक्ती मिलमधीले सबूतच अटकवणार बलात्कारांना
 दि. 26. मुंबई - ज्या ठिकाणी छायाचित्रकार महिलेवर पाच नराधमानी सामूहिक बलात्कार केला त्या घटनास्थळावरील परागकण त्यांना लटकवणार आहेत.

        त्यासाठी फॅारेन्सिक एक्सपर्टचे एक पथक मुंबईत दाखल झाले आहे. ज्या ठिकाणी हि घटना घडली त्या ठिकाणच्या वनस्पतीवरील परागकण हे पथक गोळा करणार आहे. हे परागकण त्या ठिकाणी ते नराधम त्या ठिकाणी होते ह्यावर शिकामोर्तब करतील. आरोपीचे कपडे बळीत महिलेचे कपडे यावरील परागकणांचे अंश आणि वनस्पतीवरील परागकण यांचे नमुने तपासणार आहेत.

जिल्हीतील 13 तालुक्यांना अशुध्द पाणी

दि. 23, ठाणे जिल्हा प्रतिनिधी - जलशुद्धीकरण यंत्रणा बंद पडल्यामुळे ठाणे जिल्हातील 13 तालुक्यांना अशुध्द पाणी पिण्याची वेळ आली आहे.
          ठाणे जिल्हातील ग्रमीण भागातल्या 13  तालुक्यांमधील 25 लाखापेक्षा अधिक नागरिकांना पिण्याचे अशुध्द पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या जिल्हा परिषदेकडे केवळ 20 प्रादोशिक योजना आहे. शुध्द पाणी मिळावे यासाठी योजनांमधील पाण्यात टीसीएल पावडर टाकली जाते. ती टाकण्यासाठी प्रादेशिक पाणीयोजनांवर रोजंदारीवर कामगार आहेत.परंतु एक टीसीएल पावडर टाकली जाते यांचे निश्चित प्रमाण त्यांना ठाऊक नसते आपल्या मर्जीनुसार ते पाण्यात टीसीएल मिसळतात. टीसीएलच्या कमी-जास्त प्रमाणामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.  असे वैधकीय अधिका-यांच                                                     म्हणेण आहे. 

हिंदुस्थानात पुन्हा स्फोट घडवेन

नवी दिल्ली. दि. 18  लशकर-ए-तोयबाची बॅाम्ब मशीन असलेल्या 70 वर्षीय क्ररकर्मा दहशतवादी करीम टुंडाला अटक झाली तरी त्याची मस्ती मात्र कायम आहे. तरूंगातून बाहेर पडताच पुन्हा बॅाम्बस्फोट घडवून आशी धमकी त्यांने दिली आहे.
देशात वेगवेगळ्या शहरांमध्ये झालेल्या 40 धमाक्यांचा मास्टरमाइंड असलेल्या अब्दुल करीम टुंडा याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने काल नेपाळ सीमेवर बेड्या ठोकल्या सध्या दिल्ली पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. 

सोमवार, २६ ऑगस्ट, २०१३


दाऊद कराचीतच
कुख्यात डॅान आणि भारताचा मोस्ट वॅाण्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानच्या कराचीत राहत असल्याचा कबुली जबाब टुंडाने दिल्ला आहे.
   भारताच्या वॅाण्टेड दहशतवाध्यापैकी एक असलेल्या टुंडाला अटक झाल्याने दाऊद, आयएसआयसह लष्कर-ए-तोयबा आणि अन्य दहशतवाद्यावर प्रकाश पडणार आहे.

मंगळवार, ३० जुलै, २०१३


पालकाचीच उपासमार तर पोर काय खाणार

खोडाळा दि.29  आई-वडिलाच्याच खाण्याचे हाल होतात तर मुलांना पोटभर अन्न कुठून मिळणार असा सवाल मोखाड्यातील शिरसोणपाड्याच्या कुटुंबाने केला आहे.
   20 वर्षापासून सरकारी आधिकारी योजना राबवित आहेत. यात अधिका-यांचेच टार्गेट पूर्ण होत आहेत. त्यात मूल जगली काय आणि मृत्यूमुखी पडली काय त्यांची जबादारी कोणाच्याही शिरावर पडलेली नाही.  शिरसोणपाडा हा सर्वाधिक कुपोषित मुलांचा भाग आहे. य़ेथे पुरविलेले अन्न हे निष्कृष्ट दर्जाचे असून ते खाल तरी मुले ते थुकूंन टाकतात.
         महिन्याभरात जव्हार-मोखाड्यात या अदिवासी भागात 28 बालकांचा मृत्यू झाल्यामूळे सरकारी अधिका-यांनी या भागात धाव घेतली आहे. आणि परिस्थीतीच पहाणी केली आहे. विधीमंडळात याविषयी चर्चा करण्यात येणार असल्याचे समजले आहे.

सोमवार, २९ जुलै, २०१३


लहान मुलाध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढते आहे.

 दि.28 भारतात सर्वात जास्त मधुमेहाचे पेशंट आढळतात. सध्या लहान मुलामध्ये यांचे प्रमाण आधि्क आ़ढळते आहे.
           मधुमेह हा आई-वडिल यांच्याकडून आलेल्या अनुवंशिकता किंवा लठठपणा यामूळे  अधिक प्रमाणात हा आजार उद्भभवताना दिसतो आहे. दर महिन्यात 200 पेशंट या वयोगटात मोडतात.  नियमित व्यायाम आणि आहारात बदल असावा असे मधुमेह व हद्यरोग तत्ज्ञाचे म्हणणे आहे.


कृपोषणामुळे 28 बालकांचा मृत्यू

खोडाळा. ता 29   आदिवासी भागातील जव्हार-मोरवाड्या येथे गेल्या महिन्यात 28 बालकांचा कृपोषणामुळे मृत्यू झाला आहे. 
   कृपोषित बालकांना सरकारकडून देण्यात येणा-या पौष्टिक आणि सकस आहाराचा दर्जा निकृष्ट असल्याचे येथील आदिवासीनी सांगितले. अंगणवाडीतील सेविकांनी हीच तक्रार केल्याचे समजते. सरकारची मात्र यावर काहीच प्रतिक्रिया नाही.



सलमान खान वर अरोप निश्चित 

दि. 25 अभिनेता सलमान खान यांने दारूच्या नशेत गा़डी चालवून वांद्रे येथील फुटपाथवर झोपलेल्या व्यक्तीला चिरडल्यामुळे 11 वर्षानंतर त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा आरोप बुधवारी सेशन्स कोर्टात निश्चित करण्यात आला आहे. 

पोलिसाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

 दि.28  शुक्रवारी कळव्यात राहणा-या पोलिस कॅान्सेटबलने एका अल्पवयीन मुलीचा विनभंग केला. या कॅन्स्टेबला तेथील रहिवाशांनी त्यांच्या विरूध्द गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.
    कळव्यातील मनिषानगर येथे ही मुलगी आपल्या बहिणीच्या वाढदिवसाचे निमंत्रण द्याला आली होती तेव्हा त्या चाळीत राहणारा संतोष बनसोडे वय (28) ह्या तिचा विनयभंग केला. संतोष बनसोडे हा पोलिस महामार्ग वाहतुक विभागात कार्यरत आहे.

बुधवार, २४ जुलै, २०१३


पाऊसच पाऊस

ठाणे दि. 24 काल झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि समुद्राला अलेल्या भरतीमुळे मुंबई शहर जलमय झाले. त्यमुळे सर्वच मुंबईकर बेजार झाले होते. गेल्या चार दिवसापासून येणा-या या पावसामूळे काल जणू धिगंणाच घातला होता.
     आज ही मूसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामूळे शाळा-कलेजेसला जाण्या-या विध्र्यार्थ्याची संख्या फरच कमी दिसली. काही                                           शाळांना सुटटी असल्याचे ही समजले आहे.अजून चार दिवस तरी हा पाऊस असाच कायम असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मंगळवार, २३ जुलै, २०१३


मुबंईत जोरदार पाऊस

आज सकाळपासून मुबंईत तसेच ठाण्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. 
मुबंई वेधशाळेने सांगितल्याप्रमाणे पावसाचा जोर अधिक वाढण्यची शक्यता आहे.
 कुठेही वाहतूक विसकळीत न झाल्यामुळे शाळा-कऍलेजेसे सुरु आहेत.





शुक्रवार, १७ मे, २०१३


आयपीएल-फिक्सिंग

 भारतात सुरू असलेल्या आयपीएलच्या यंदाच्या सहाव्या मैसमात शांताकुमारन श्रीशांत, अजित चंडिला व अंकित चव्हाण या राजस्थान रॉयल्स संघातल्या क्रिकेटपटूनी स्पॉट फिक्सिंग केल्यामुळे त्यांना दिल्ली पोलिसांनी मुंबईत अटक केली आहे.
     पुणे वॉरियर्सविरूध्द राजस्थान या लढतीत अजितला 20 लाख रूपये देण्यात आले होते. तर दुस-या षटकातमध्ये 14 धावा काढण्याकरिता किंवा त्याही पेक्षा अधिक धावा काढण्याकरिता जादा मोबदला देण्यात येणार होता. तर 9 मे रोजी श्रीशांतला एका षटकात अधिक धावा काढण्यासाठी 40 लाख रूपयाची लाच दाखवण्यात आली होती. किग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्या मध्ये हा खेऴ झाला होता. तर अंकित चव्हाण हा या स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी नसतानाही फसला. त्याला प्रवृत्त करण्यात आले.

गुरुवार, १६ मे, २०१३



उन्हाळ्याच्या सुट्टीतील लहान मुलांच्या आवडी

कार्टुन पाहणे –

कार्टुन म्हटले की लहान मुले खुदकन हसतात. आणि खूपच कमी बोलणारे मुलही पटकन एखाद्या कार्टुनसच नाव घेऊन मोकळे होतात. त्यांना कळतही नाही की हे कार्टूनस म्हणजे फक्त एक कल्पनाच असते. आहे, कल्पना हा शब्दपण त्यांना कठून कळणार पण खर ते ह्या कार्टून मध्ये इतके रमतात. की, आजूबाजूला काय चाललेल. आहे हे ही त्यांना कळत नाही. आईची हाक आणि पपाचा धपाटाही यांना त्यांच्या दुनियेतून लवकर आणत नाही. जणू हे कार्टूनस त्यांचे विश्व बनते. मग त्या टि.व्ही वरचे कर्यक्रम पाहण्याचा हट्ट जर त्यांना घरातल्या मोठ्यांनी पाहण्यास बंद केले तर हे त्यांचे पोस्टर त्यांची खेळणी किंवा अगदीच काही जमल नाही तर अंगावर घातलेला टी-शर्ट पाहून आपल समाधान मानतात.
   तो छोटा भीम व त्यांची सेना जगू, चुटकी राजू, ढोलू-पौलू,कालिया हे जणू ह्याचेच मित्र त्यांचे पराक्रम त्यांच्या झालेल्या फजित्या, त्यांच्यावर आलेलले प्रसंग ह्या लहानमुलांना विचारांना तर इतक्या पटकन सांगतात की बस. आता ह्यांना आजीआजोबाची राणी किंवा परीची कथा आवडत नाही तर छोट्या भीमची स्टोअरी आवडते.
   आणि हेच कि काय म्हणून सध्या ह्या कार्टुनसवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून ऍनिमेशन सारखी कला कृती उद्यास आली. त्यातून निघणारी थ्रीडी मूव्ही तर पाहण्यासारखीच असतात.
    ह्या कार्टूनचे कपडे,खेळणी, त्यांच्या पार्टी वेअर मध्ये त्यांचे क्रॅउन, माक्स, वॉच, शूज, बॅग, कंपाउस बॉक्स, इ. अनेक वस्तू बाजारात येतात. व मुलं त्याचाच हट्ट धरतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाण्याचा हट्ट करणारी आपली पिढी लुपत होऊ पाहात आहे. त्यांना वॅटर पार्क सारख्या अनैसर्गिक दुनियेत आपण नेऊ त्यांना नैसर्गिक सैदर्याची अनुभूती दाखविण्यास परावृत्त करत आहोत.

बुधवार, १५ मे, २०१३


सर्वाची चाहती माधुरीचा आज वाढदिवस

15 मे- सर्वांची चाहती असलेल्या सिने-अभिनेत्री माधुरी दिक्षित-नेने हिचा आज 45 वा वाढदिवस आहे.
तिच्या चाहत्यांनी तिला भरभरून प्रेम दिले. तेजाब पासून ते "आ नच ले " पर्यतचा तिचा प्रवास म्हणजे तिच्या चाहत्यांनी तिच्या वर केलेल्या प्रेमाची खरी कसोटीच. तिने अनेक हिंदी चित्रपटात काम करून आपले खास स्थान निर्माण केले. तिच्या मधुर हास्याने अनेकांना मंत्रमुग्ध केले.
आता तिने एक नविन एॅप्लिकेशन लॅाच केली आहे.व तिच्या चाहत्यांना ती आता केवळ मोबाईल, आयपॅड, आयफोनवरच बघता येणार आहे. या एॅपलिकेशनमध्ये वेलकम पेजदवरे माधूरी्च्या ट्विटर किंवा फेसबुक अकांउटवर जाण्यासाठी लिंक दिलेली आहे.

शुक्रवार, १० मे, २०१३


आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी नवी मुंबईची मागणी

   ठाणे – नवी मुबंईत आंतरराष्ट्रय विमानतळ व्हावे अशी मागणी सिडकोने केली आहे. त्यासदर्भात ते थेट मुख्यमंत्राशीच बोलणार आहेत.
आता पर्यंत नवी मुबंईतील सिडको भागात (दोन हजार 54 हेक्टर) जमिनीपैकी 291 होक्टर जमीन त्याभागातील 10 दहा गावांतील ग्रामस्थांची आहे सिडकोकडे ह्या प्रकल्पग्रस्तांनी 20 कोटी रूपयांची मागणी केली आहे. पण त्यावर अद्याप कसलीच चर्चा झाली नाही. पण प्रकल्पग्रस्तांना मोबदला म्हणून 20 टक्के जमिन देण्यात येणार आहे.
अरुणा शिंदे

एलीबीटी हट्टापायी सर्वसामान्यांचे हाल्ल

एलीबीटीबाबतच्या हट्टी धोरणामुळे राज्यसरकारच्या विरुद्ध व्यापा-यांमध्ये तीव्र असंतोषाचा उद्रक निर्माण झाला आहे. गेल्या 18 दिवसापासून तीव्र आंदोलन व मोर्चे सर्वत्र सुरू आहेत. असे असूनही राज्य सरकार एलबीटी विरोधात कोणतीही ठाम भूमिका घेण्यास अजूनही तयार नाही.
   मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासाठी प्रचार माध्यामाचा आधार घेण्याचे ठरविले आहे. दुसरीकडे या प्रश्नाबाबत सरकारकडे कोणताही तोडगा नाही. अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे. त्यासंदर्भात काही कॉग्रेस खासदारांनी पक्ष अध्यक्षा सोनीया गांधीकडे धाव घेतली पण एलबीटीवरून सरकारमध्येच मतभेद असल्याचे दिसत आहे. व्यापा-यांनी एलबीटी 7 दिवसाच्या आत मागे घेतला नाही तर कॅग्रेसला मतदान करणार नाही असे आव्हान केले आहे. तसेच काही व्यापा-यांनी कॉग्रेसला मतदान न करण्याचे ठरविले आहे.
मुख्य बाजारपेठेतून माल घेण्याचे बंद झाल्यामुळे टंचाईच्या अभावी जादा दर वाढवून व्यापा-यांनी अन्नधान्याचे दर वाढविले आहेत. मालाची ने-आण करणारे माथाडी काममागार तीन दिवसापासून बिन पगारी बसले आहेत. या बंदामूळे सर्वसामान्यंचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत. पण मुख्यमंत्री आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे. कोणत्याही परिस्थितीत निर्णय मागे घेणार नाही. व्यापा-यांनी कितीही दबाव टाकला तरी या दबावा सरकार बळी पडणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.
-    अरूणा शिंदे

गुरुवार, ९ मे, २०१३


आंदोलनर्ते प्रभाकर देशमुख यांस अटक

सोलापूर जिल्हयातील पाणी टंचाई विरोधात आंदोलन करण्यासाठी बसलेल्या प्रभाकर देशमुख यांस पोलिसांनी अटक केली आहे.
  मुख्यमंत्र्याकडे घेऊन जातो असे खोटे सांगुन अटक करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व शेतकरी संघटनामध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली आहे.

अरुणा शिंदे

बुधवार, ८ मे, २०१३


          कॉग्रेस 118 जागानी विजयी

कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉग्रेस 118 जागांनी आज विजयी झाली.
                        मागील दोन दशकानंतर भाजपची सत्ता जाऊन कॉग्रेसने आपली सत्ता कर्नाटकमध्ये स्थापन केली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे एकूण पाच आमदार निवडूण आले आहेत.बहुमताने विजयी झाल्यामुळे कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीनी आपला आनंद व्यक्त करत आमदारांनीच नेत्याची निवड करावी असे स्पष्ट केले आहे.

मंगळवार, ७ मे, २०१३


एलबीटी आणणारच – मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

    एलबीटी लागू करण्याच्या विरोधात मुबंईतील किरकोळ व्यापा-यांनी कडक बंद पुकारला आहे. संपूर्ण जगात आणि भारतात फक्त मुबंई शहरातच जकात ही कालबाह्य पध्दत अजूरही लागू आहे. पण आता मुबंईतही स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू होणार आहे. त्यासाठी मुबंई महापालिका कायद्यात सुधारणा करावी लागणार आहे. असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
     2013 मधील ऑक्टोबर महिन्यापासून एलबीटी राज्यभर लागू केला जाणार आहे. मुबंई-पुण्यातील किरोकोळ व्यापा-यांनी त्याला विरोध केला आहे, शहरातील काही व्यापा-यांनी बेमुदत बंद केला आहे, एलबीटीत काही त्रुटी असल्यास त्या दूर केल्या जातील. तीनलाख ते चार लाखापर्यतची आयात-निर्यात करणा-या व्यापा-यांवर एलबीटी लागू केली जाणार नाही.
       ग्राहकांडून व्यापा-यांना केवळ कर वसूल करावयाचे आहेत, त्यासदर्भात काही प्रश्न असतील तर त्यावर सरकार चर्चा करण्यास तयार आहे.

सोमवार, ६ मे, २०१३


सी.बी. आय.ने दिले कोळसा वाटप प्रकरणाचे प्रतिज्ञापत्र


नवी दिल्ली  -  केंद्रिय अन्वेषण विभागाने आज सोमवारी कोळसा खाण वाटपातील गैरव्यवहार प्रकरणाबाबत काही बदल सुचविले होते, त्या संदर्भात सी बी आयने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. कायदेमंत्री िअश्विनीकुमार आणि  एटर्नी जनरल जी.एम. वहाणवटी यांनी सीबीआयच्या स्थितिदर्शक अहवालात थोडे बदल सुचविले होते.

        'ग्रेस इंडस्ट्रज' आणि 'विकास मेटल्स एण्ड पॅावर्स लिमिटेड' या कंपन्याविरूध्द कोळसा खाण वाटप गैरव्यवहार केल्याचा खटला दाखल करण्यात आला होता. त्या संदर्भातील काही सरकारी आधिका-यांविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वे फसवणूक केल्याचे व कट केल्याचे गुन्हे दाखल केले होते.

         या संदर्भात "टीम अण्णा" ने सरकाराचे धोरण आणि पतंप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर प्रश्न उपस्थित केला होता. त्या संदर्भात खाजगी कंपन्याना कोटयावधी फायदा झाला असावा असे ही आरोप "टीम अण्णा" ने केला होता.

सी.बी.आयने हे प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर पुढील काळात हया प्रश्नावर कोणते मार्गदर्शक तत्त्व सर्वेाच्च न्यायलयाला देता येईल अशी अपेक्षा सी बी आय ने व्यक्त केली.
 

अरूणा शिंदे      

गुरुवार, ४ एप्रिल, २०१३

मुंब्रा कडकडीत बंद


मुंब्रा कडकडीत बंद


मुंब्रा येथील अनधिकृत बांधकामांविरोधात ठाणे महापालिकेने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज मुंब्र्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षांनी शुक्रवारी बंदची हाक दिली होती. या बंदला तेथील नागरिकांनी १०० टक्के प्रतिसाद दिला आहे.

मुब्र्यातील इमारत दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर कधी नव्हे इतकी तत्परता दाखवत मागील चार दिवसांमध्ये शिळफाटा तसेच मुंब्र्यातल्या अनेक अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा हातोडा चालवला. यामुळे अनेक वर्षांपासून या विभागात वास्तव्याला असणारे हजारो नागरिक रस्त्यावर उतरले.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष हा भागात पाय रोवून आहेत. आपल्या मतदारांच्या घरांवर होणारी कारवाई त्यांना मोठी जड जाणार असल्याचे त्यांच्या ध्यानात आल्याने त्यांनी या कारवाईला जोरदार विरोध केला आहे. आधी या ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरु आहेत ती पाडा, अशी मागणी या दोन्ही पक्षांकडून करण्यात येत आहे. इमारत पडल्याने 'तोंड पोळलेल्या' महापालिकेने आधीच राहत्या घरांवर कारवाई केली आणि जनतेची नाराजी ओढावून घेतली आहे. त्यामुळेच बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे.