शुक्रवार, १७ मे, २०१३


आयपीएल-फिक्सिंग

 भारतात सुरू असलेल्या आयपीएलच्या यंदाच्या सहाव्या मैसमात शांताकुमारन श्रीशांत, अजित चंडिला व अंकित चव्हाण या राजस्थान रॉयल्स संघातल्या क्रिकेटपटूनी स्पॉट फिक्सिंग केल्यामुळे त्यांना दिल्ली पोलिसांनी मुंबईत अटक केली आहे.
     पुणे वॉरियर्सविरूध्द राजस्थान या लढतीत अजितला 20 लाख रूपये देण्यात आले होते. तर दुस-या षटकातमध्ये 14 धावा काढण्याकरिता किंवा त्याही पेक्षा अधिक धावा काढण्याकरिता जादा मोबदला देण्यात येणार होता. तर 9 मे रोजी श्रीशांतला एका षटकात अधिक धावा काढण्यासाठी 40 लाख रूपयाची लाच दाखवण्यात आली होती. किग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्या मध्ये हा खेऴ झाला होता. तर अंकित चव्हाण हा या स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी नसतानाही फसला. त्याला प्रवृत्त करण्यात आले.

गुरुवार, १६ मे, २०१३



उन्हाळ्याच्या सुट्टीतील लहान मुलांच्या आवडी

कार्टुन पाहणे –

कार्टुन म्हटले की लहान मुले खुदकन हसतात. आणि खूपच कमी बोलणारे मुलही पटकन एखाद्या कार्टुनसच नाव घेऊन मोकळे होतात. त्यांना कळतही नाही की हे कार्टूनस म्हणजे फक्त एक कल्पनाच असते. आहे, कल्पना हा शब्दपण त्यांना कठून कळणार पण खर ते ह्या कार्टून मध्ये इतके रमतात. की, आजूबाजूला काय चाललेल. आहे हे ही त्यांना कळत नाही. आईची हाक आणि पपाचा धपाटाही यांना त्यांच्या दुनियेतून लवकर आणत नाही. जणू हे कार्टूनस त्यांचे विश्व बनते. मग त्या टि.व्ही वरचे कर्यक्रम पाहण्याचा हट्ट जर त्यांना घरातल्या मोठ्यांनी पाहण्यास बंद केले तर हे त्यांचे पोस्टर त्यांची खेळणी किंवा अगदीच काही जमल नाही तर अंगावर घातलेला टी-शर्ट पाहून आपल समाधान मानतात.
   तो छोटा भीम व त्यांची सेना जगू, चुटकी राजू, ढोलू-पौलू,कालिया हे जणू ह्याचेच मित्र त्यांचे पराक्रम त्यांच्या झालेल्या फजित्या, त्यांच्यावर आलेलले प्रसंग ह्या लहानमुलांना विचारांना तर इतक्या पटकन सांगतात की बस. आता ह्यांना आजीआजोबाची राणी किंवा परीची कथा आवडत नाही तर छोट्या भीमची स्टोअरी आवडते.
   आणि हेच कि काय म्हणून सध्या ह्या कार्टुनसवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून ऍनिमेशन सारखी कला कृती उद्यास आली. त्यातून निघणारी थ्रीडी मूव्ही तर पाहण्यासारखीच असतात.
    ह्या कार्टूनचे कपडे,खेळणी, त्यांच्या पार्टी वेअर मध्ये त्यांचे क्रॅउन, माक्स, वॉच, शूज, बॅग, कंपाउस बॉक्स, इ. अनेक वस्तू बाजारात येतात. व मुलं त्याचाच हट्ट धरतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाण्याचा हट्ट करणारी आपली पिढी लुपत होऊ पाहात आहे. त्यांना वॅटर पार्क सारख्या अनैसर्गिक दुनियेत आपण नेऊ त्यांना नैसर्गिक सैदर्याची अनुभूती दाखविण्यास परावृत्त करत आहोत.

बुधवार, १५ मे, २०१३


सर्वाची चाहती माधुरीचा आज वाढदिवस

15 मे- सर्वांची चाहती असलेल्या सिने-अभिनेत्री माधुरी दिक्षित-नेने हिचा आज 45 वा वाढदिवस आहे.
तिच्या चाहत्यांनी तिला भरभरून प्रेम दिले. तेजाब पासून ते "आ नच ले " पर्यतचा तिचा प्रवास म्हणजे तिच्या चाहत्यांनी तिच्या वर केलेल्या प्रेमाची खरी कसोटीच. तिने अनेक हिंदी चित्रपटात काम करून आपले खास स्थान निर्माण केले. तिच्या मधुर हास्याने अनेकांना मंत्रमुग्ध केले.
आता तिने एक नविन एॅप्लिकेशन लॅाच केली आहे.व तिच्या चाहत्यांना ती आता केवळ मोबाईल, आयपॅड, आयफोनवरच बघता येणार आहे. या एॅपलिकेशनमध्ये वेलकम पेजदवरे माधूरी्च्या ट्विटर किंवा फेसबुक अकांउटवर जाण्यासाठी लिंक दिलेली आहे.

शुक्रवार, १० मे, २०१३


आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी नवी मुंबईची मागणी

   ठाणे – नवी मुबंईत आंतरराष्ट्रय विमानतळ व्हावे अशी मागणी सिडकोने केली आहे. त्यासदर्भात ते थेट मुख्यमंत्राशीच बोलणार आहेत.
आता पर्यंत नवी मुबंईतील सिडको भागात (दोन हजार 54 हेक्टर) जमिनीपैकी 291 होक्टर जमीन त्याभागातील 10 दहा गावांतील ग्रामस्थांची आहे सिडकोकडे ह्या प्रकल्पग्रस्तांनी 20 कोटी रूपयांची मागणी केली आहे. पण त्यावर अद्याप कसलीच चर्चा झाली नाही. पण प्रकल्पग्रस्तांना मोबदला म्हणून 20 टक्के जमिन देण्यात येणार आहे.
अरुणा शिंदे

एलीबीटी हट्टापायी सर्वसामान्यांचे हाल्ल

एलीबीटीबाबतच्या हट्टी धोरणामुळे राज्यसरकारच्या विरुद्ध व्यापा-यांमध्ये तीव्र असंतोषाचा उद्रक निर्माण झाला आहे. गेल्या 18 दिवसापासून तीव्र आंदोलन व मोर्चे सर्वत्र सुरू आहेत. असे असूनही राज्य सरकार एलबीटी विरोधात कोणतीही ठाम भूमिका घेण्यास अजूनही तयार नाही.
   मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासाठी प्रचार माध्यामाचा आधार घेण्याचे ठरविले आहे. दुसरीकडे या प्रश्नाबाबत सरकारकडे कोणताही तोडगा नाही. अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे. त्यासंदर्भात काही कॉग्रेस खासदारांनी पक्ष अध्यक्षा सोनीया गांधीकडे धाव घेतली पण एलबीटीवरून सरकारमध्येच मतभेद असल्याचे दिसत आहे. व्यापा-यांनी एलबीटी 7 दिवसाच्या आत मागे घेतला नाही तर कॅग्रेसला मतदान करणार नाही असे आव्हान केले आहे. तसेच काही व्यापा-यांनी कॉग्रेसला मतदान न करण्याचे ठरविले आहे.
मुख्य बाजारपेठेतून माल घेण्याचे बंद झाल्यामुळे टंचाईच्या अभावी जादा दर वाढवून व्यापा-यांनी अन्नधान्याचे दर वाढविले आहेत. मालाची ने-आण करणारे माथाडी काममागार तीन दिवसापासून बिन पगारी बसले आहेत. या बंदामूळे सर्वसामान्यंचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत. पण मुख्यमंत्री आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे. कोणत्याही परिस्थितीत निर्णय मागे घेणार नाही. व्यापा-यांनी कितीही दबाव टाकला तरी या दबावा सरकार बळी पडणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.
-    अरूणा शिंदे

गुरुवार, ९ मे, २०१३


आंदोलनर्ते प्रभाकर देशमुख यांस अटक

सोलापूर जिल्हयातील पाणी टंचाई विरोधात आंदोलन करण्यासाठी बसलेल्या प्रभाकर देशमुख यांस पोलिसांनी अटक केली आहे.
  मुख्यमंत्र्याकडे घेऊन जातो असे खोटे सांगुन अटक करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व शेतकरी संघटनामध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली आहे.

अरुणा शिंदे

बुधवार, ८ मे, २०१३


          कॉग्रेस 118 जागानी विजयी

कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉग्रेस 118 जागांनी आज विजयी झाली.
                        मागील दोन दशकानंतर भाजपची सत्ता जाऊन कॉग्रेसने आपली सत्ता कर्नाटकमध्ये स्थापन केली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे एकूण पाच आमदार निवडूण आले आहेत.बहुमताने विजयी झाल्यामुळे कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीनी आपला आनंद व्यक्त करत आमदारांनीच नेत्याची निवड करावी असे स्पष्ट केले आहे.

मंगळवार, ७ मे, २०१३


एलबीटी आणणारच – मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

    एलबीटी लागू करण्याच्या विरोधात मुबंईतील किरकोळ व्यापा-यांनी कडक बंद पुकारला आहे. संपूर्ण जगात आणि भारतात फक्त मुबंई शहरातच जकात ही कालबाह्य पध्दत अजूरही लागू आहे. पण आता मुबंईतही स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू होणार आहे. त्यासाठी मुबंई महापालिका कायद्यात सुधारणा करावी लागणार आहे. असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
     2013 मधील ऑक्टोबर महिन्यापासून एलबीटी राज्यभर लागू केला जाणार आहे. मुबंई-पुण्यातील किरोकोळ व्यापा-यांनी त्याला विरोध केला आहे, शहरातील काही व्यापा-यांनी बेमुदत बंद केला आहे, एलबीटीत काही त्रुटी असल्यास त्या दूर केल्या जातील. तीनलाख ते चार लाखापर्यतची आयात-निर्यात करणा-या व्यापा-यांवर एलबीटी लागू केली जाणार नाही.
       ग्राहकांडून व्यापा-यांना केवळ कर वसूल करावयाचे आहेत, त्यासदर्भात काही प्रश्न असतील तर त्यावर सरकार चर्चा करण्यास तयार आहे.

सोमवार, ६ मे, २०१३


सी.बी. आय.ने दिले कोळसा वाटप प्रकरणाचे प्रतिज्ञापत्र


नवी दिल्ली  -  केंद्रिय अन्वेषण विभागाने आज सोमवारी कोळसा खाण वाटपातील गैरव्यवहार प्रकरणाबाबत काही बदल सुचविले होते, त्या संदर्भात सी बी आयने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. कायदेमंत्री िअश्विनीकुमार आणि  एटर्नी जनरल जी.एम. वहाणवटी यांनी सीबीआयच्या स्थितिदर्शक अहवालात थोडे बदल सुचविले होते.

        'ग्रेस इंडस्ट्रज' आणि 'विकास मेटल्स एण्ड पॅावर्स लिमिटेड' या कंपन्याविरूध्द कोळसा खाण वाटप गैरव्यवहार केल्याचा खटला दाखल करण्यात आला होता. त्या संदर्भातील काही सरकारी आधिका-यांविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वे फसवणूक केल्याचे व कट केल्याचे गुन्हे दाखल केले होते.

         या संदर्भात "टीम अण्णा" ने सरकाराचे धोरण आणि पतंप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर प्रश्न उपस्थित केला होता. त्या संदर्भात खाजगी कंपन्याना कोटयावधी फायदा झाला असावा असे ही आरोप "टीम अण्णा" ने केला होता.

सी.बी.आयने हे प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर पुढील काळात हया प्रश्नावर कोणते मार्गदर्शक तत्त्व सर्वेाच्च न्यायलयाला देता येईल अशी अपेक्षा सी बी आय ने व्यक्त केली.
 

अरूणा शिंदे