सी.बी. आय.ने दिले
कोळसा वाटप प्रकरणाचे प्रतिज्ञापत्र
नवी दिल्ली - केंद्रिय अन्वेषण विभागाने आज सोमवारी कोळसा खाण वाटपातील गैरव्यवहार प्रकरणाबाबत काही बदल सुचविले होते, त्या संदर्भात सी बी आयने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. कायदेमंत्री िअश्विनीकुमार आणि एटर्नी जनरल जी.एम. वहाणवटी यांनी सीबीआयच्या स्थितिदर्शक अहवालात थोडे बदल सुचविले होते.
'ग्रेस इंडस्ट्रज' आणि 'विकास मेटल्स एण्ड पॅावर्स लिमिटेड' या कंपन्याविरूध्द कोळसा खाण वाटप गैरव्यवहार केल्याचा खटला दाखल करण्यात आला होता. त्या संदर्भातील काही सरकारी आधिका-यांविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वे फसवणूक केल्याचे व कट केल्याचे गुन्हे दाखल केले होते.
या संदर्भात "टीम अण्णा" ने सरकाराचे धोरण आणि पतंप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर प्रश्न उपस्थित केला होता. त्या संदर्भात खाजगी कंपन्याना कोटयावधी फायदा झाला असावा असे ही आरोप "टीम अण्णा" ने केला होता.
सी.बी.आयने हे प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर पुढील काळात हया प्रश्नावर कोणते मार्गदर्शक तत्त्व सर्वेाच्च न्यायलयाला देता येईल अशी अपेक्षा सी बी आय ने व्यक्त केली.
अरूणा शिंदे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा