स्त्रीप्रतिष्ठा
स्त्रीप्रतिष्ठा म्हणजे स्त्रीचा स्वत:बददलाचा आत्मविश्वास: तसेच
स्त्री प्रतिष्ठा म्हणजे समाजासाठी किंवा एकूण निसर्गासाठी स्त्रीच्या असित्वाला
असलेले महत्व, तेव्हा स्त्री प्रतिष्ठा हा कोणावरही अवलंबून नसतो स्त्रीने स्वत:ताची प्रतिष्ठा स्वत:च
ओळखली पाहिजे एखाद्या धडधाकट माणसाला गुलाम कोणी राबविले तर त्याला वाईट वाटणारच
तो जरी गुलाम नसला पण आजारी आसला तरी तो काम करू शकणार नाही परंतु अशा अवस्थेत तर त्याला अधिकच वाईट वाटणार
आजारामुळे मनुष्य परस्वाधीन होतो आणि त्याची स्वप्रतिष्ठा कमी होते. तेव्हा
स्त्रीचे अरोग्य हि तिची सर्वप्रथम प्रतिष्ठा आहे. स्त्रीपुरतेच नाही तर पुरूषाचे
आरोग्य ही त्याती प्रतिष्ठा आहे.प्रत्येक व्यक्तीला स्वत:चे अस्तित्व शारिरीक, मानिसिक व आत्मिक पातळीवर अनुभवता
आले पाहिजे व त्याचे समाधान घेऊन असे काही तरी करता आले पाहिजे. ज्यांने स्वत:ला स्वत:चा आदर वाटेल. हीच ती प्रतिष्ठा जशी स्त्रीला
प्रतिष्ठा हवी तशीच पुरूषालाही हवी. असे दोन प्रतिष्ठा मिळून एक प्रतिष्ठीत कुटुंब
होते. त्यातूनू एक प्रतिष्ठत समाजा उद्यास येतो व समाजाची भरभराटी व उत्क्रांती
होते. तेव्हा स्रीप्रतिष्ठेचा प्रथम विचार करायचा तो स्त्री आरोग्योचा. त्यासाठी तीने स्वत:च प्रयत्न करुन स्त्रीनेच स्वता:ची प्रतिष्ठा वाढविली पाहिजे.