शनिवार, ३१ ऑगस्ट, २०१३


हुडयांच्या मागणी वरून गर्भवती विवाहितेस जाळले. 

दि. 29   उत्तर प्रदेशितील संभल नगर येथे हुंड्याच्या मागणीवरुन सासू-सास-यंनी एका गर्भवती महिलेची हत्या केल्याचे वृत्त आज सूत्रांनी दिले आहे.
   रूपवती असे या महिलेचे नाव असून हुंड्याची मागणी पुर्ण न केल्याबद्दल तिला अगांवर रॅकेल टाकून जाळण्यात आले असे पोलिसांनी सांगितले. यामूळे गंभीर जखमी झालेल्या या महिलेस तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले.  मात्र उपचार सूरु असतानाच तिचा मुत्यू झाला.
        या संदर्भात रूपवतीचे वडिल वीरदाल यांनी तक्रार नोंदविली आहे. तिच्या सासरच्या लोकांपैकी अद्याप कोणालाही अटक झाली नाही.

मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१३

http://members.webs.com/s/sitebuilder/pages/297593144/

पत्नीस मारहाण-आोम पुरीना अटक

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्याविरोध्द त्यांच्या पहिल्या पत्नीने वर्सोवा पोलिस ठाण्यात मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोदंविला आहे.
           ओम पुरी हे वर्सोवा येथील सात बंगला परिसरातील त्रिशूल ईमारतीत राहतात. त्यांची पहिली पत्नी यांच्यात वाद आहे. त्याबाबत हे प्रकरण न्यायलयात चालू आहे. ओम पुरी यांनी निर्वाह खर्च दयावा. अशी मागणी नंदिता यांनी न्यायलयात केली आहे. तिने न्यायलयात हजार राहून नये म्हणून त्यांनी नंदिता यांना छडीने मारहाण केली. असा अरोप वर्सोवा पोलिस ठाण्यात ओम पुरीविरोध्द नोंदविला आहे.


शक्ती मिलमधीले सबूतच अटकवणार बलात्कारांना
 दि. 26. मुंबई - ज्या ठिकाणी छायाचित्रकार महिलेवर पाच नराधमानी सामूहिक बलात्कार केला त्या घटनास्थळावरील परागकण त्यांना लटकवणार आहेत.

        त्यासाठी फॅारेन्सिक एक्सपर्टचे एक पथक मुंबईत दाखल झाले आहे. ज्या ठिकाणी हि घटना घडली त्या ठिकाणच्या वनस्पतीवरील परागकण हे पथक गोळा करणार आहे. हे परागकण त्या ठिकाणी ते नराधम त्या ठिकाणी होते ह्यावर शिकामोर्तब करतील. आरोपीचे कपडे बळीत महिलेचे कपडे यावरील परागकणांचे अंश आणि वनस्पतीवरील परागकण यांचे नमुने तपासणार आहेत.

जिल्हीतील 13 तालुक्यांना अशुध्द पाणी

दि. 23, ठाणे जिल्हा प्रतिनिधी - जलशुद्धीकरण यंत्रणा बंद पडल्यामुळे ठाणे जिल्हातील 13 तालुक्यांना अशुध्द पाणी पिण्याची वेळ आली आहे.
          ठाणे जिल्हातील ग्रमीण भागातल्या 13  तालुक्यांमधील 25 लाखापेक्षा अधिक नागरिकांना पिण्याचे अशुध्द पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या जिल्हा परिषदेकडे केवळ 20 प्रादोशिक योजना आहे. शुध्द पाणी मिळावे यासाठी योजनांमधील पाण्यात टीसीएल पावडर टाकली जाते. ती टाकण्यासाठी प्रादेशिक पाणीयोजनांवर रोजंदारीवर कामगार आहेत.परंतु एक टीसीएल पावडर टाकली जाते यांचे निश्चित प्रमाण त्यांना ठाऊक नसते आपल्या मर्जीनुसार ते पाण्यात टीसीएल मिसळतात. टीसीएलच्या कमी-जास्त प्रमाणामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.  असे वैधकीय अधिका-यांच                                                     म्हणेण आहे. 

हिंदुस्थानात पुन्हा स्फोट घडवेन

नवी दिल्ली. दि. 18  लशकर-ए-तोयबाची बॅाम्ब मशीन असलेल्या 70 वर्षीय क्ररकर्मा दहशतवादी करीम टुंडाला अटक झाली तरी त्याची मस्ती मात्र कायम आहे. तरूंगातून बाहेर पडताच पुन्हा बॅाम्बस्फोट घडवून आशी धमकी त्यांने दिली आहे.
देशात वेगवेगळ्या शहरांमध्ये झालेल्या 40 धमाक्यांचा मास्टरमाइंड असलेल्या अब्दुल करीम टुंडा याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने काल नेपाळ सीमेवर बेड्या ठोकल्या सध्या दिल्ली पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. 

सोमवार, २६ ऑगस्ट, २०१३


दाऊद कराचीतच
कुख्यात डॅान आणि भारताचा मोस्ट वॅाण्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानच्या कराचीत राहत असल्याचा कबुली जबाब टुंडाने दिल्ला आहे.
   भारताच्या वॅाण्टेड दहशतवाध्यापैकी एक असलेल्या टुंडाला अटक झाल्याने दाऊद, आयएसआयसह लष्कर-ए-तोयबा आणि अन्य दहशतवाद्यावर प्रकाश पडणार आहे.