हुडयांच्या मागणी वरून गर्भवती विवाहितेस जाळले.
दि. 29 उत्तर प्रदेशितील संभल नगर येथे हुंड्याच्या मागणीवरुन सासू-सास-यंनी एका गर्भवती महिलेची हत्या केल्याचे वृत्त आज सूत्रांनी दिले आहे.
रूपवती असे या महिलेचे नाव असून हुंड्याची मागणी पुर्ण न केल्याबद्दल तिला अगांवर रॅकेल टाकून जाळण्यात आले असे पोलिसांनी सांगितले. यामूळे गंभीर जखमी झालेल्या या महिलेस तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सूरु असतानाच तिचा मुत्यू झाला.
या संदर्भात रूपवतीचे वडिल वीरदाल यांनी तक्रार नोंदविली आहे. तिच्या सासरच्या लोकांपैकी अद्याप कोणालाही अटक झाली नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा