शनिवार, २ फेब्रुवारी, २०१३




उध्दव-राज एकत्र येतील काय? टाळी एका हाताने वाजत नाही!
आम्हाला एकत्र बसवून हा प्रश्न विचारा!
मुंबई, दि. 29 – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रदीर्घ मुलाखतीने महाराष्ट्र्च्या राजकारणात  वादळ निर्माण झाले आहे. उद्भव ठाकरे यांनी प्रथमच कोणताही आडपडदा न ठेवता सर्वच प्रश्नांना सडेतोड उत्तर दिले. शिवसेना आणि मनसे उद्धव ठ्करे आणि राज ठाकरे एकत्र येणार काय? मराठी मतांची विभागणी टाळणार काय? या लाखमोलाच्या प्रश्नांवर उध्दव ठाकरे यांनी अक्षरश: बॉम्बगोळा टाकणारे उत्तर दिले. हा प्रश्न आम्हाला दोघांना एकत्र बसवून विचारा. या प्रश्नाचे उत्तर दोघांना एकत्र देऊ द्या.!उध्दव ठाकरे यांच्या या विधानाने आजपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक तरंग उमटणार आहेत. पुढल काही महिने उध्दव ठाकरंच्या या भुमिकेवरच राजकीय चर्चेचे फड रंगणार आहेत.