एलबीटी आणणारच – मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
एलबीटी लागू करण्याच्या विरोधात
मुबंईतील किरकोळ व्यापा-यांनी कडक बंद पुकारला आहे. संपूर्ण जगात आणि भारतात फक्त
मुबंई शहरातच जकात ही कालबाह्य पध्दत अजूरही लागू आहे. पण आता मुबंईतही स्थानिक
संस्था कर (एलबीटी) लागू होणार आहे. त्यासाठी मुबंई महापालिका कायद्यात सुधारणा करावी
लागणार आहे. असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
2013 मधील ऑक्टोबर महिन्यापासून
एलबीटी राज्यभर लागू केला जाणार आहे. मुबंई-पुण्यातील किरोकोळ व्यापा-यांनी त्याला
विरोध केला आहे, शहरातील काही व्यापा-यांनी बेमुदत बंद केला आहे, एलबीटीत काही
त्रुटी असल्यास त्या दूर केल्या जातील. तीनलाख ते चार लाखापर्यतची आयात-निर्यात
करणा-या व्यापा-यांवर एलबीटी लागू केली जाणार नाही.
ग्राहकांडून व्यापा-यांना केवळ
कर वसूल करावयाचे आहेत, त्यासदर्भात काही प्रश्न असतील तर त्यावर सरकार चर्चा
करण्यास तयार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा