उन्हाळ्याच्या सुट्टीतील लहान मुलांच्या आवडी
कार्टुन पाहणे –
कार्टुन म्हटले की लहान मुले खुदकन हसतात. आणि खूपच कमी बोलणारे मुलही पटकन
एखाद्या कार्टुनसच नाव घेऊन मोकळे होतात. त्यांना कळतही नाही की हे कार्टूनस म्हणजे
फक्त एक कल्पनाच असते. आहे, कल्पना हा शब्दपण त्यांना कठून कळणार पण खर ते ह्या
कार्टून मध्ये इतके रमतात. की, आजूबाजूला काय चाललेल. आहे हे ही त्यांना कळत नाही.
आईची हाक आणि पपाचा धपाटाही यांना त्यांच्या दुनियेतून लवकर आणत नाही. जणू हे
कार्टूनस त्यांचे विश्व बनते. मग त्या टि.व्ही वरचे कर्यक्रम पाहण्याचा हट्ट जर
त्यांना घरातल्या मोठ्यांनी पाहण्यास बंद केले तर हे त्यांचे पोस्टर त्यांची खेळणी
किंवा अगदीच काही जमल नाही तर अंगावर घातलेला टी-शर्ट पाहून आपल समाधान मानतात.
तो छोटा भीम व त्यांची सेना जगू,
चुटकी राजू, ढोलू-पौलू,कालिया हे जणू ह्याचेच मित्र त्यांचे पराक्रम त्यांच्या
झालेल्या फजित्या, त्यांच्यावर आलेलले प्रसंग ह्या लहानमुलांना विचारांना तर
इतक्या पटकन सांगतात की बस. आता ह्यांना आजीआजोबाची राणी किंवा परीची कथा आवडत
नाही तर छोट्या भीमची स्टोअरी आवडते.
आणि हेच कि काय म्हणून सध्या ह्या
कार्टुनसवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून ऍनिमेशन सारखी कला कृती उद्यास आली.
त्यातून निघणारी थ्रीडी मूव्ही तर पाहण्यासारखीच असतात.
ह्या कार्टूनचे कपडे,खेळणी,
त्यांच्या पार्टी वेअर मध्ये त्यांचे क्रॅउन, माक्स, वॉच, शूज, बॅग, कंपाउस बॉक्स,
इ. अनेक वस्तू बाजारात येतात. व मुलं त्याचाच हट्ट धरतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत
गावी जाण्याचा हट्ट करणारी आपली पिढी लुपत होऊ पाहात आहे. त्यांना वॅटर पार्क
सारख्या अनैसर्गिक दुनियेत आपण नेऊ त्यांना नैसर्गिक सैदर्याची अनुभूती दाखविण्यास
परावृत्त करत आहोत.
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा