गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१३

 अष्टविनायक दर्शन


     मयुरेश्र्वर, मोरगांव

   अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर. या गणपतीस श्री मयुरेश्र्वर असंही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी इथल्या पूजेचा वसा घेतला होता श्री मयुरेश्र्वर गणेशाचे हे स्वयंभू आणि आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी सुखकर्ता दु:खहर्ता ही आरती श्री समर्थ रामदास स्वामीना याच मंदीरात स्फुरली.



     चिंतामणी, थेऊर

 अष्टविनायकापैकी  थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचं ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचं हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणं खूप मोठं गणेशभक्त होत. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचं निधन थेऊरलाच झालं. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील याच ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कराकीर्द दाखवणारं कलात्मक दालन आहे.थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर. तालुक्यात असून पुण्यापासून हे 30 कि.मी. अतंरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे.


 सिध्दिविनायक, सिध्दटेकसिध्दटेकचा श्री सिध्दविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. हे भीमा नदीवर वसलेलं सिध्दिविनायकाचं स्वयंभू स्थान आहे, याचा गाभारा लांब-रूंदीनं भरपूर मोठा आहे. तसंच मंडपही मोठा आहे. पुण्यातील अहिल्याबाई होळकर यांनी हे मंदीर बांधले आहे.अहमदनगर जिल्हयातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौडपासून 99 कि.मी. अंतरावर आहे. तर राशिनपासून 142 किं.मी अतंरावर आहे.

  महागणपती, रांजनगाव

अष्टविनायकापैकी हा चौथा गणपती, या गणपतीला महागणपती असे म्हणतात. महागणपतीचं स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.त्रिपुरासुर या राक्षसास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या हेत्या. या शक्तीचा दुरुपयोग करून हा राक्षस स्वर्ग व पृथ्वीलोकांना भयंकर त्रास देत होता. त्यावेळी या राक्षसाचा वध करण्यासाठी शिवशंकराने गणेशाचे नमन करून करवून घेतला आशी दतंकथा आहे. अष्टविनायकापैकी सर्वात शक्तीमान असं महागणपतीचे हे रूप आहे. त्यांची सोड उजवीकडे आहे.  श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न आणि मनमोहक अशी श्रीची मूर्ती आहे.



   विघ्नेश्र्वर, ओझरअष्टविनायकापैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. इथल्या श्रीची मूर्ती लांब रुंद असून आष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखलं जात. श्रीच्या डोळ्यात माणिक असून कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न आणि मंगल मूर्ती आहे. श्री गणेश विघ्नाच हरण करतो म्हणून त्याला विघ्नेश्र्वर म्हणतात.
जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून 14 कि.मी. वर तर पुण्यापासून 85 कि.मी. वर आहे. इथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र आणि खोडद इथली आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुबिण आहे.



    गिरिजात्मक, लेण्याद्री अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक, जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजित्मक गणेशाचं हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदीरात दगडी खांब आहेत आणि त्यावर वाघ, सिंह, हत्ती असं सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. मंदीरात जाण्यासाठी सुमारे 400 पाय-या आहेत.लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक हा जुन्नरपासून 7 किं.मी अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे 97 कि.मी. अतंरावर हे ठिकाण आहे.


   वरदविनायक, महाडमहाडचा वरदविनायक हा अष्टविनायकापैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान आहे. या मंदीरासदर्भात एक कथा प्रसिध्द आहे.  एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली त्याप्रमाणे त्या व्यक्तीनं शोध घेतला आणि मूर्ती मिळाली तीच या मंदीरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. गणेशाची मूर्ती सिंहासन रूढ आहे आणि उजव्या सोंडेची आहे.रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली-खालापूरच्या दरम्यान आहे.



   बल्लाळेश्वर, पलीपालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्र्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचं हे मंदीर पूर्वेभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे.पाली खोपोलीपासून 38 कि.मी. अतंरावर आहे. तर पुण्यापासून 111 कि.मी अंतरावर आहे. खोपोली – पेण रस्त्यावर पालीस जाण्यासाठी रस्ता फुटतो. तर पनवेल-गोवा या राष्ट्रय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा