पालकाचीच उपासमार तर पोर काय खाणार
खोडाळा दि.29 आई-वडिलाच्याच खाण्याचे हाल होतात तर मुलांना पोटभर अन्न कुठून मिळणार असा सवाल मोखाड्यातील शिरसोणपाड्याच्या कुटुंबाने केला आहे.
20 वर्षापासून सरकारी आधिकारी योजना राबवित आहेत. यात अधिका-यांचेच टार्गेट पूर्ण होत आहेत. त्यात मूल जगली काय आणि मृत्यूमुखी पडली काय त्यांची जबादारी कोणाच्याही शिरावर पडलेली नाही. शिरसोणपाडा हा सर्वाधिक कुपोषित मुलांचा भाग आहे. य़ेथे पुरविलेले अन्न हे निष्कृष्ट दर्जाचे असून ते खाल तरी मुले ते थुकूंन टाकतात.
महिन्याभरात जव्हार-मोखाड्यात या अदिवासी भागात 28 बालकांचा मृत्यू झाल्यामूळे सरकारी अधिका-यांनी या भागात धाव घेतली आहे. आणि परिस्थीतीच पहाणी केली आहे. विधीमंडळात याविषयी चर्चा करण्यात येणार असल्याचे समजले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा