प्रोजेक्ट
दिल्लीतील
सामूहीक बलात्काराच्या घटनेचे तपशील जाहीर झाले तेव्हा, त्यात दिसून आलेल्या
आरोपींच्या क्रौर्याने सारा देश हादरला. या घटनेनंतर देशाच्या प्रत्येक
कानाकेप-यात कुठे ना कुठे अशा घटना घडत असल्याचे रोजच उजेडात येऊ लागले आणि
सगळीकडे एकच भीतीचे, दहशीतीचे वातावरण निर्माण झाले, प्रत्येकंच्या मनात कुठेतरी
असुरक्षितेची पाल चुकचूकू लागली , त्यातच राजकीय वा सार्वजनिक ठिकाणी नाव असलेल्या
मंडळीमध्ये या घटनांना नेमके कोण जबाबदार याबाबत निष्कर्ष काढायची जणू चढाओढच
लागली. त्याच्या मतमतांतराने लोकांनचा मनातील गोंधळ अधिकच वाढला, पण या सा-या
गोंधळाहून अधिक धोकादायक गोष्ट घडू लागली , ती म्हणजे देशीतील युवावर्गला लौंगिक
भान देण्यात समाज आणि शिक्षणव्यवस्थेला अपयश आल्याचे या घटनातून ढळढळीतपणे दिसत
असताना, बोट मात्र पुन्हा मुलीकडेच दाखवले गेले आणि त्यांना आरोपीच्या पिंज-यात
उभे करण्याचीच स्पर्धा रंगली. त्यात लौंगिक भानाचा प्रश्न बाजूलाच राहिला.
लौंगिक शिक्षणाची गरजच काय, इथपासन ते कुणी ध्ययला हवे इथपर्यत सा-याच बाबतीत
आज आपल्याकडे गोंधळाची परिस्थिती आहे. “लौंगिक
भान” या विषयाबाबत चारचौघात बोलायाचे नाही किंवा यावर चर्चा
काय करयची, त्या त्या वयात आपोआप कळत सगळ, किंवा आता पालकाने का मुलासमोरसेक्सची
चर्चा करायची, असे हजारो सवाल याबाबत उपसस्थित केले जातात. एकूण या विषयाकडे
बघण्याची समाजाची पूर्वग्रहदूषित दृष्टी त्याचे गांर्भिय आणि गरज याचा विचारच करू
जेत नाही. यातूनच अनेक विचित्र समस्या दिवसागत वाढत आहे. “मुलगी” म्हणजे काहितरी वेगळी आहे. तिची गुप्तांगे हा
पुरूषांसाठी आकर्षणाचा, शौर्य गाजवणयाचा किंवा तथाकथित हक्काचा विषय आहे, हा विचार
वर्षानुवर्षे दृढ झाला आहे. महिलांविषयीच्या अनेक बंधनांच्या चौकटी, हक्काचा
भ्रांमक कल्पना हळू हळू मोडून काढण्यात यश आले. पण मुलगा ही उपभोगाची वस्तू हा ठम
विचार अजूनही समाजात घर करून आहे. महिलांच्याबाबत इतर परिस्थिती, भ्रम यात बदल होत
असताना हा समज मात्र अधिक खोलवर का रूजतोय
यावर गांर्भीयाने विचार करण्याची वेळ आली आहे. मात्र पिरिस्थिती इतकी
टोकाला गेलेली असताना आणि सामाजिक पातळीवर या विषयाच्या औपचिरिक शिक्षणाची आवशयकता
आहे का, या प्राथमिक चर्चेच्या मतावरच सारे अडकून पडले आहे.
आज
प्रसिध्दीमाध्यमाचा मोठा प्रभाव मुलांवर आहे. इंटरनेटचा सहज वापर उपलब्ध आहे. त्यामूळेच त्याना हवी ती माहिती, हव्या त्या
क्लिप्स आज एका क्लिकवर उपलब्ध आहे. मात्र लौंगिकतेच्या बाबतीत हीच बाब अत्यंत
धोकादयक आहे. या माध्यमातून अतिशय अर्धवट, चुकीच्या पध्दतीने वा योग्यतेची शहानिशा
न होता माहिती मुलांनपर्यत पोहचत असल्याने त्यानंतरची त्याची कृतीही कोणत्याहि
विचारशिवाय होताना दिसते. मुलगा मुलगी वयात आल्यानंतर त्याच्यात होणारे नेमके बदल, अडचणी , कुचंबणा किंवा असंख्य
प्रश्न यांचे निराकरण करण्याइतका खुलेपण आज यायला हवा. त्यातूनच मुलांच्या मनातली
संभ्रमाची परिस्थिती दूर होऊन पुढील अनर्थ टाळला जाऊ शकतो.
आपल्या समाजात मुलाला वाढवताना तो कुणी वेगळा आहे, असे संस्कार न कळतच दिले
जाते, त्याने मौदानी खेळ खेळावेत, तर मुलीने भातुकलीचा डाव, हे समीकरण, म्हणजे
ताकदीवर त्याचा अधिकार, तर मुलीने कसे रांगडी दिसावे, त्याचे देखणपण कृतीत असावे,
तर मुलगी मात्र सुंदर, नाजुक रेखीवच असावी, तिची चाल हावभाव मुली सारखी असावी अशा
विभागण्या पूर्वापार झाल्या आहेत. त्यामुळेच शक्ती सामर्थ्य आणि वर्चस्वाची
त्याचीच बाजू, हे लहानपणापासून ब-याच घरात मुलच्या मनावर बिंबवले जातात यामध्ये
बदल करायला हवा, मुलाला एक मुलग म्हणून वाढविण्या पेक्षा एक माणूस म्हणून वाढवणे
आवश्यक आहे या माणूसपणात इतरंचा आदर करणे, त्याचे स्वांतत्र्य, आधिकर दाखवताना तो
विचार करू शकेल.
मुळातच
मुलंना वाढवताना एका चाकोरीबध्दतेनेच वाढवले जाते.तू मुलगा आहेस, ढू रडतोस काय
मुलीसारखा? यासारखे विचार घरोघरी कानावर पडतात घराघरात मुली,
त्यांची मासिक पाळी, मुलांचे वयात येणे, त्यानंतर होणारे बदल यावर खुली चर्चा
करण्यास आजही अघोषित बंदीच दिसून येतो. सेक्स, लैंगिक संबंध हे काहि तरी वेगळे आणि
आतिशय गुप्त आहे, असा आभास निर्माण करण्याची अजिबात आवश्यकता नाही, वयोयपरत्वे प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारा हा
आवश्यक बदल आहे. त्यामिळेच त्याची चर्चा टाळण्यापेक्षा त्याला अतिशय प्रल्भगपणे
सामोरे जाण्याती क्षमता निर्माण करणे हे अधिक महत्तवाचे असते म्हणून याबाबत जितका
अधिक खुलेपणा येईल ही गोष्ट अतिशय स्वाभाविक असल्याचे पटवले जार्इल तेवढे त्याबाबत
आकर्षण आणि जाणून घेण्याचा अट्टहास कमी होऊ शकेल. मुलांबरोबरच मुलींनाही त्यांचा
सन्मान , स्वातंत्र्य आणि निर्णय घेण्यचा
अधिकार आहे. त्याच्या मनाविरूध्द
गोंष्टींना त्या नाही म्हणून शकतात. आणि त्यांच्या मताचाही आदर राखलाच
पाहिजे. त्यातबरोबर लौंगिक संबंधाबाबतही
तिला स्वंतत्र मत आहे, असा विचार करणारे समाजमन आता तयार करायला हवे.
त्यामुळे एखादी गोष्ट सहद मिळाली नाही तर ती वाटेल ते करून मिळवायचीच हा आग्रह
राहणार नाही. तसेच मुलीचे राहणीमान पेहरावे वागणे बोलणे याबाबतही त्या विचार करू
शकते. ते मूलांचे लौंगिक भावना उत्तेजित करण्याचे कारण ठरते. असे बेगडी सर्मथन
करण्याचे अजिबात कारण नाही.
वयात
आलेल्या मुलाबरोबर टि व्ही बघताना पूर्वी सॅनिटरी नॅपकिन्सच्या जाहिराती दाखविल्या
तरी त्यावर टिकेची झोड उठवीली जात होती. तीच बाब कॉन्ट्रॉसेप्टिव्ह पिल्स च्या वेळीही या गोळीच्या जाहिरातीमुळे
लौंगिक संबंधांना घातले जात असल्याचे आरोप करत विरोध झाला. मात्र त्याच अनुषंगाने
ये गोळीमुळे प्रेग्नसी टळली जात असली तरी असुरक्षित संबंधामुळे होणारे रोग किंवा
संसर्ग टाळता येत नाही त्यामुळे या गोळीचा वापर धोकादायक कसा आहे याबाबत चर्चा
मात्र झालीच नाही.त्यामुळे ही गोळी अशा संबंधासाठी ढालच आहे असा समज झाला
परंपरेने
आखून दिलेल्या चौकटी मोडून महिला घराबाहेर पडल्या. आज मुलींच्या करिअरकडे
बघण्याबाबत आधिक खुलेपणा आला. पालकही अधिक विस्ताराने वेगळा विचार करू लागले.
मात्र अशा घटनानंतर पालकही धासतावले आहेत दहशितीखाली आहेत. त्यामुळेत आता कुठे
स्वतंत्र्याची फळे चाखू लागलेल्या मुलीवर पुन्हा एकदा बंधनाचे असूड ओढले जाऊ लागले
आहे. जपून जा लोकांनचा काही भरवसा नाही, वेळेत घरी आलच पाहिजे, एवढ्या उशिरा
जायलाच पाहिजे का? असे सवाल
पुन्हा केले जात आहेत. दिल्ली आणि त्यानंतर झालेल्या घटनेनंतर पालक पुन्हा एकदा
कळजीत आहेत. प्रशनांच्या मुळांचा शोध घेण्याऐवजी भलत्याच गोंष्टीची उपाय म्हणून
भलामण केली जात आहे. इथे गरज आहे थोडे अतंर्मुख होऊन स्त्री-पुरूष समानातेचे निकष
पुन्हा एकदा तपासून पाहण्याची त्यासाठी अधिकाधिक निकोप वातावरण तयार करण्याची.
संस्कारामध्ये शिकवली जाणारी एक महत्तवाची गोष्ट म्हणजे मोठ्याचं ऐकायच. ते
नेहमीच बरोबर असतात. पण आज परिस्थिती खरंच आशी आहे का, याचा विचार करून या
शिकवण्यात बदल व्हायला हवा. अगदी
लहानपणापासून मुलांना चांदल्या, वाईट स्पर्शाची ओळख करून द्यायला हवी तसेच
न पटणा-या गोष्टीवर नकार देण्याचे, प्रतिकार करण्याते संस्कारचे द्यायला हवेत.
आजच्या बजलाच्या परिस्थितीत ते सर्वाधिक महत्तवाचे आहे. व्यक्ती म्हणून मुलांना अवकाश आणि सीमा राखायला
शिकवलंच पाहिजे.
एक नको असलेला अनुभव
हा किस्सा
मला माझ्या मैत्रिणीणे संगितला. ती रोज तिच्या कामानिमत्ताने कळवा ते दादरला
अपडाउन करते. सकाळची वेळ ही थोडी घाईगर्दीची असते व माणसाचीही रहदारी भरपूर असते
त्यामुळे फक्त आपल्या ऑफिसवध्ये लवकर कसे पोहचता येईल याकडे लक्ष द्यावे लागते.
आम्ही
कळवात खारेगाव येथे राहतो. कळव्याला जाण्यासाठी खारेगाव फाटकापासून कळवा
स्टेशनपर्यत रिक्षाने जावे लागते. तिथे सिटच्या रिक्षा मिळतात. ट्रेन आल्यानंतर
रिक्षासाठी खूप मोठ्या रांगा लावाव्या लागतात. कळवा ते फाटक यांच्यातील अंतर फक्त
3 मिनिटांचे आहे.
त्या
दिवशी ती नेहमीप्रमाणे रात्री 9.30 वाजता खारेगाव फाटकात जाणा-या रिक्षात बसली पण
त्या दिवशी तिला थोडा उशिरच झाला होता त्यामुळे रिक्षाला गर्दी अशी नव्हती. ती
ज्या रिक्षेत बसली होती तिच्या बाजूला दोन माणस बसली व रिक्षावाल्याच्या बाजूला
आणखीएक माणूस बसला. रिक्षा चालू झाली ज्या रस्त्याने या रिक्षा जातात तिथे एकही
लाइट नाही. व बाजूला थोडेजंगलही आहे. थोडी घरेही आहेत पण लांब आहेत.
रिक्षा
थोड्याच अंतरावर गॆली आणि माझ्या मौत्रीणीला तिच्या गालावरून, खांद्यावरून खाली
पाठीपर्यत कोणीतरी मुददम हात फरवित होत. ज्यांने कोणी तिला हात लावला तो तिच्या
बजूला बसलेला माणूस नसून त्या माणसांच्या बाजूला बसलेल्या पुरूषांचा हात होता. ती
बिचारी थोडायावेळासाठी इतकी घबरली की जणू आता पुढे काय होणार? ही रिक्षा इथेच तर थांबणार नाही ना? पुढ
का पटकन जात नाही? असे अनेक प्रश्न तिच्या मनात आले. तिने पटकन
स्वता:ला सावरल व थोडी जास्त रिक्षेच्या कडेली सरकून बसली.
बोलणार तरी कोणाला कारण तिला कळाले हा हात तिच्या बाजूला बसलेल्या माणसाचा नसून
दुस-याच माणसाचा आहे. आणि ती जरी बोलली असती तरी तिच्या वर बाकीच्यानी विश्वास
ठेवला असता क? कारण हे जे घडले ते एका निर्जण स्थळी घडले. रिक्षा
थांबविली तरी प्रब्लेम झाला असता. आणि बोलुनही काहीच उपयोग नाही परत घरी जायला
उशिर झाला असता.
आता सांगा
आशा वेळी काय करणार आपण, दाबून मुक्क्याचा मार बसल्यासारख महिलांचे होते. नंतर तो
माणूस पैसे देऊन निघनही गेला होता.
नमस्कार अरुणा एक दम सुंदर लेख लिहिला आहे अगदी विषयाला धरून आणि एक दम खोल वर विचार करून हा लेख लिहिला आहे. आवडला. हो एक खंत वाटते जे तुम्ही तुमच्या मैत्रिणीचा अनुभव सांगितला ना खरच ते खूप करुण सत्य आहे. ह्या साठी आजच्या युवा पिढी ने काही तरी केले पाहिजे. आणि स्त्रियान कडे आणि मुलीन कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलयला हवा. आणि हे हि तुम्ही खरे सागितले आहे कि हल्ली आपल्या सामाजात लैंगिक शिकण उघड पणे दिले जात नाही सर्वांनाच त्या बद्दल बोलण्यात संकोच वाटतो. पण १०७ फम वर लैंगिक ते वर एक कार्यक्रम येतो रोज दुपारी त्या वर लैंगिक ते वर माहिती दिली जाते आणि आपल्या शंका दूर केल्या जातात. एक दम सुंदर कार्यक्रम आहे. आता कुठे आपला समाजात लैंगिक तेच्या शिक्षणावर शिकण सुरु झाले आहे पण हे नुसते शिकण देऊन काही फायदा नाही. पुरुष प्रधान संकृती मध्ये पुरुषांनी स्त्रियान कडे पाहण्याचा दुर्ष्टीकोन बदलला पाहिजे. जो पर्यंत त्यांच्या विचारण मध्ये बदल होत नाही तो पर्यंत स्त्रियांवर आणि मुलींवर अत्त्याचार होणारच.
उत्तर द्याहटवा