शुक्रवार, १८ जानेवारी, २०१३


                        फसवणुकीप्रकरणी 5 वर्षाची शिक्षा
                               बोगस कागदपत्रांआधारे कर्ज काढले
पोलिसांनी याप्रकरणी चिमनानी भावांसह एकूण 11 जणांविरोधात गुन्हे दाखल केला होता, त्यापैकी सुरेंद्र सिंग, किशोर चिमनानी, आकांक्षा सुरेश संहिता, हेमंत छेडा, हमेश दिगपाल, वसीम  अन्सारी आणि सूनील केसवानी आदी 8 आरोपी फरार होते. पोलिस त्यांचा शोध घेऊ शकलेले नाहित.
       आरोपीनी बोगस फ्रॅकिंग करून सरकारची फसवणूक केल्याचे अतिरिक्त सरकारी वकील पी.डी.पाटील यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणले. त्यामुळे आरोपींना कडक शिक्षा करावी, अशी विनंती त्यांनी केली होती. याप्रकरणी कोर्टाने 28 साक्षीदारंची तपासणी केली असता आरोपी सराईत गुन्हेगार नाहीत. त्यामुळे त्यांना कमीतकमी शिक्षा करावी असा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला आहे.
       बुधवारी या पक्ररणी अंतिम सुनावणी झाली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यावर जिल्हा अतिरिक्त सत्र न्या.यू.बी.शुक्ल यांनी आरोपींना कठोर शिक्षा व 25 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. चिमनांनी बंधूसह अटक झालेल्या आणखी एका आरोपीची मात्र कोर्टाने कबळ पुरांव्याअभावी निदोष सुटका केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा