शनिवारी सर तुम्ही आम्हाला
भारत 4 india.com ही साईट दाखवली. ही साईट मला खूप आवडली. ही साईट दाखविण्यामागचा उदेद्श कळाला.
जर आम्हाला वेब जर्नलिस्ट म्हणून काम करायच असेल तर त्यातले input व output कसे जमवायचे हे प्रत्यक्षात कळाले. त्यामूळे
मनावरचा थोडासा ताण कमी झाला आहे.
भारत 4india.com मधल्या सहका-यानी खूप
चागलं समजावल. या वेब साइटला दिलेल्या नावाप्रमाणेच त्याच्या बातम्याही त्यात तशाच
आहेत. भारत व india याचे जे स्पष्टीकरण त्यांनी केले आहे ते त्यांनी दिलेल्या
नावातून जाणवते. कोणत्याही देशाला एक इंग्लिश व एक मराठी असे नाव नसते पण आपल्या
देशातील लोकांमध्ये जी एक सामाजिक दरी आहे व त्यात शेतक-याचे जे स्थान आहे
त्यांच्या अडचणी, त्यातून त्यांनी काढलेले मार्ग यांचे सविस्तर व्हिडिओ शुटसह भारत
4india.com या वेब साईटवर दिसते. तसेच या वेब साईटवर एकही जाहिरात नसताना त्यावर झालेला
खर्च कौतुकास्पद आहे.
या वेब साईटवर काम करायला मला खूप आवडेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा