गडचिरोलीमध्ये चकमकीत चार नक्षलवादी ठार
गडचिरोली- छत्तीसगड सीमेवरील घनदाट जंगलात झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भामरागड तालुक्यातील भटपार या गावाजवळच्या जंगलात काल रात्रीच्या सुमारास पोलिस गस्त घालत होते. यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांवर बेछूट गोळीबार केला. त्याला पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यात चार नक्षलवादी ठार झाले. परंतु, या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले आहेत, असा दावा पोलिसांनी केला आहे. चार नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
चकमकीचे वृत्त मिळाल्यानंतर या परिसरातील पोलिस गस्त वाढविण्यात आली आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह इतर नक्षलवादी घेऊन जात असल्याने चकमकीत प्रत्यक्ष किती नक्षलवादी ठार झाले, याची नेमकी माहिती मिळत नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा